सत्तेचा सुर्य

Started by SONALI PATIL, January 12, 2015, 07:31:17 PM

Previous topic - Next topic

SONALI PATIL

काल तुमच्या पार्टीचा सुर्य होता,
आमच्या कौलावरती होता अंधार ।
दक्षीनायन संपून, उत्तरायन होईल,
आमच्या पार्टीचा येइल सुर्य,
परवा तो हिरवा होता,
आता भगवा होईल...
जातीच्या आरक्षीत कौला वरती,
घरा घरात प्रकाश होईल.
कधी निळा,
कधी हिरवा,
कधी भगवा,
सत्तेचा सुर्य,
हस्तांतरीत होईल वेळोवेळी,
ज्याच्या त्याच्या जाती धर्माच्या,
नावा खाली विकास करतील आपआपला...
मानवतेचा सुर्य,
सत्याचा सुर्य,
नितीमूल्यांचा सुर्य उगवेल का हो कधी १
गरीबांच्या झोपडीत,
अंधारलेल्या गावात,
शेतक-याच्या काळजात,
पडेल का प्रकाश कधी १
अहो सांगा कष्टकर्यांचा सुर्य
उगवेल का हो कधी १.....


sonali patil

कवि - विजय सुर्यवंशी.


Rajesh khakre