का तू मला आवडायचास…...

Started by Radha Phulwade, January 13, 2015, 11:12:49 AM

Previous topic - Next topic

Radha Phulwade

      का तू मला आवडायचास....
      जर तू माझा नव्हतास.........
का माझ्यावर हक्क गाजवायाचास
का माझ्या डोळ्यातील भावना टिपायचास
मी दुखी असताना मला हसवायाचास
मला  सुखद स्वप्नांत रंगवायचास
जर तू माझा नव्हतास.........
              का मला रोज भेटायाचास
              का माझ्या इतका जवळ यायचास
              माझ्यात पूर्ण रंगून जायचास
             माझ्या शब्दाने वेडा  व्हायचास
             जर तू माझा नव्हतास.........
हो एक दिवस साऱ्या जगाला पटेल कि तू माझा नव्हतास
एके  दिवशी मीही म्हणेल कि तू माझा नव्हतास
पण खर सांग  तुझ्या मनाला तू कसं पटवशील
कि खरंच तू माझा नव्हतास.........
                                             राधा

Mandar gadkari


Amit Samudre

....खरंच तू माझा नव्हतास......
खूप मस्त आहे कविता ... राधा जी

Roshani ubale


Atul salunkhe


सुलभा

गमला होता "सकलगुणसंपन्न" तुज तो
गमली त्याला कुणी "सकलगुणसंपन्न" दुसरी
असेल भासत तिज "सकलगुणसंपन्न" कुणी तिसरा
होईल शेवटी कुणाचे कुणाशी तरी शुभमंगल.

Aakanksha Shelke




Rakesh Raut

what a poem!! khup chhan.......asach changl changl lihit raha  :) :)