खरंच मनं वाचता आली असती तर...

Started by Rajesh khakre, January 13, 2015, 06:19:23 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

खरंच मनं वाचता आली असती तर...
तुझ्या मनावरच्या सर्व रेषा वाचल्या असत्या मी अलगदपणे...

तुझी निमूटपणे राहणारी मुद्रा अन भाव
त्याचाही घेता आला असता ठाव सहजपणे...

कितीतरी दिवस झुलत न राहता
तुला काय वाटते माझ्याबद्दल हे ही कळाले असते ठळकपणे...

तुझा चेहरा नाही दाखवत खरे भाव उमटणारे
तुझे डोळे मात्र बोलतात कधि कधि खरं न कळतपणे...

तुला ही ओढ माझी कि मी आपला उगीच घोळतोय लाळ कळाले असते स्पष्टपणे...

तुझे शब्द ही अर्थ बदलतात
माझ्याकडे येतानी
मी तसाच गोंधळतो नेहमी अभावितपणे...

तुला सर्व सांगावे मनातले
कि तू डोळ्यात बघून ओळखशील माझ्या केव्हा प्रेमळपणे

तुझे ते पाहणे अन् लाजरे हसणे यात दडलय आणखी काही
कि फिरकी घेतेय माझी खोडकरपणे

तुला विचारीन ही म्हणतो मी कधीतरी
पण हा कधि तर येतच नाही सराईतपणे

खरंच मन वाचता आली असती तर...
मनं तुटण्यापासून वाचली असती सह्रदयपणे...

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com

बकुळ

माणसाला दुसर्‍यांची मनं वाचता आली असती तर
जगात माणसांमाणसांमधे वेगवेगळ्या स्तरांवर
भांडणतंटे, मार्‍यामार्‍या, खून असा सावळागोंधळ
केव्हाच होऊन माणसांचे समाज मुळात कधीच निर्माण झाले नसते;
मग "खरंच मन वाचता आली असती तर...
मनं तुटण्यापासून वाचली असती सह्रदयपणे" अश्या प्रकारच्या
कारुण्यभरित कविता कोणी रचण्याइतपत सामाजिक सुस्थिती दूरच.


 





Rajesh khakre

आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहे
धन्यवाद