आठवणी...

Started by श्री. प्रकाश साळवी, January 13, 2015, 09:13:22 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

आठवणी...

जे माझ्या मनात आहे ते मी बोलणार नाही
हरवलेली वाट धुक्याची मी शोधणार नाही

जरी पाहीले मी चांदण्यात फिरताना तुला
डोळे मिटून मी चांदणे विसरणार नाही

केले जरी आता तू फीतूर चांदण्यांना जरी
बाग तुझ्या बहाण्यांची मी शिंपणार नाही

सुगंध आता जरी तू शिंपडून आली बरी
वाटते जे तूला मात्र आता घडणार नाही

धुंडाळून पाहीले जरी मज तू रानोरानी
आयुष्य गत जन्माचे पुनःश्च स्मरणार नाही

आले जरी भरोनी वादळी ढग आसवांचे
चिंब भिजून आता तरीही मी रडणार नाही

श्री.प्रकाश साळवी
दि. १३-०१-२०१४

RAM KADAM

बिखरे हुवे पत्ते सिमटने लगे...साला मंजील यही है...हम ही बिखर ने लगे......!

RAM KADAM

जब दिल ने चाहा तब,जुबा पे बात आई....और जब जुबा ने चाहा तो कलम थमी...और कलम ने चाहा तब कागज पे बात आई...!

मोहिनी

आले जरी भरोनी वादळी ढग आसवांचे
चिंब भिजून आता तरीही मी रडणार नाही

...........

अंगी निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ