झुंज दे झुंजार माणसा

Started by sanjay limbaji bansode, January 14, 2015, 09:22:36 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

तू झाला असा कसा
दुःख तुझे तर पसा पसा
उमटव मर्दा तुझा ठसा
झुंज दे झुंजार माणसा ! !

आहे तुझी दणकट छाती
लढ होऊनी छत्रपती
वाढव रे लढण्याची गती
समोर तुझ्या दुश्मन अती
का बनूनी बसला नामर्द असा
झुंज दे झुंजार माणसा ! !

झालासं पिंजऱ्यातला वाघ
कॄत्य करितो दाखविता धाक
पूर्वज्याचे तू कापले नाक
चिखलात लोळसी होउन मसा
झुंज दे झुंजार माणसा ! !

उकीरडे हिंडीतो होऊनी गवा
लढ मर्दा होऊनी छावा
विसरलास तू पूर्वजाचा ठेवा
राहू नको रे बनूनी ससा
झुंज दे झुंजार माणसा ! !

संजय बनसोडे