कडू कडू खाऊन गोड गोड बोला

Started by sanjay limbaji bansode, January 15, 2015, 11:40:53 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

diabetes special
कडू कडू खाऊन  गोड गोड बोला



जरी तीळा गुळा,या जगी नाही तोड़
पण खाऊन खाऊन मज भलतीच लागली खोड
डॉक्टर येऊन मजपासी ताबडतोड
बोले मज रागाने,बंद कर खाणे गोड
आला तुझ्या जीवनी एक नवीन मोड़
तुझा दुश्मन रे गोड,बंद कर खाणे गोड ! !


ध्यानी माझ्या आलं,हे अवचित काय झाल
सोडून खाण्याचा ताल,आता झालो बेताल
ना मनी माझ्या आलं,कधी गोड कडू झाल
येवढ गोड प्यालं,आता रक्तही गोड झाल ! !


आज मकरसंक्रांतीचा सण 
पुन्हां गोड खाण्या वळें माझ मन
पण आवरे मज ह्रुदयातले वण
होई डोक्यात चालू रण
ऐकून डॉक्टरची भणभण ! !



आजही असे माझा गोड वर डोळा
येवढे होऊनही गोड खाण्या होइ मी भोळा
diabetes च्या बीमारीन झालो सारा ओला
आता कडू कडू खाऊन गोड गोड बोला ! !

संजय बनसोडे

प्रयाग


डॉक्टर म्हणे "रोज तू व्यायाम करणे फार इष्ट आहे"
मी ऐकला डॉक्टरचा आदेश - "रोज तू आराम करणे फार इष्ट आहे" 

sanjay limbaji bansode

सांगणे माझे स्पष्ट आहे
व्यायाम कराया फार कष् ट आहे