प्रेम करावे प्रेम करावे

Started by Vikas Vilas Deo, January 15, 2015, 09:04:24 PM

Previous topic - Next topic

Vikas Vilas Deo

प्रेम करावे,
झुळझुळ वाहणा-या  झ-यावर 
शीतल पाणी देणा-या नदीवर
अटळ अशा डोंगरावर
अन् अथांग निळ्याशार आकाशावर

प्रेम करावे,
वा-या बरोबर सळसळणा-या पानावर
रंगबिरंगी सुंदर फुलावर
हिरव्यागर्द झाडावर
अन्  फुलांचे रक्षण करणा-या काट्यावर

प्रेम करावे,
चमचम करणा-या चांदण्यावर
शितलता देणार्या चंद्रावर
प्रखर उष्णता देणा-या सूर्यावर
अन् अनंत अशा ब्रम्हांडावर

प्रेम करावे,
जीवन देणा-या अमृतावर
मधुर मधुर मधावर
तहान भागवणा- या पाण्यावर
अन् दाह करणा-या विषावर

प्रेम करावे
गोड गोड गालावर
लाल लाल ओठावर
निळ्याशार डोळ्यावर
अन् अपंगाच्या पायावर 

प्रेम करावे,
खेळामध्ये रमणा-या बालकांवर
उत्साहाचा झरा असणा- या तरुणांवर
अनुभवाचा खजिना असलेल्या प्रौढांवर
अन् सुरकुत्या असलेल्या वृध्दांवर

प्रेम करावे,
जन्म दिलेल्या आई वडीलांवर 
संकटात साथ न सोडणा-या सोबत्यांवर
प्रेमा पेक्षाही प्रेमळ अशा प्रियसीवर
पडतीच्या काळी पाठीमागे न पाहणा-या पत्नीवर
अन् म्हातारपणामुळे वाकलेल्या आजी -आजोबांवर.