॥ गूढ ॥

Started by श्री. प्रकाश साळवी, January 16, 2015, 03:30:50 PM

Previous topic - Next topic

श्री. प्रकाश साळवी

            ॥ गूढ ॥
कुठे शोधशी मज रानी वनी तू ?
का शोधशी मज मंदिरी राऊळी तू ?

जिथे खायला अन्न नाही पुरेसे
नसे प्यायला पाणी इथे जरासे
तिथे "भूक" म्हणजे तो मीच आहे
तहानल्यास "पाणी" तेच ईश आहे
खाऊन पोटभर म्हणशी ऊपाशी तू ।।१।।

माय माऊलीची जिथे आबाळ आहे
माता पित्यास जेथे घोर कष्ट आहे
जिथे अनाथांचा जणू अपमान होई
दूःख तयांचे का कोण समजुन घेई?
अबलेस शिणऊन  "दासी" म्हणे तू ।।२।।

कधी शोधिले अंतरी "राम" कोण आहे?
समजून घे रे तूझा तूच "देव" आहे
ऊगा शिणविशी देहास राहून ऊपाशी
दे सोडून कर्म-कांड नाते जोड या जगाशी
ऊमगेल मग खरा कोण आहेस तू ।।३।।

श्री.प्रकाश साळवी
दि. १६-०१-२०१५