मज वरी का वेळ अशी ???

Started by durga, January 16, 2015, 10:38:07 PM

Previous topic - Next topic

durga

वेळ माणसा कडून सगळ चोरून नेते
आपण झोपेत असतो आणि वेळ आपला चक्कर चालून जाते

मी होते कुणाच्या तरी आठवणीत चूर
रंगले होते स्वप्नात
वेळ ती आली .......आली आणि
स्वपन तोडून गेली
आसवांचे विष प्यायला मला एकटी सोडून गेली
वेळ जिंकली मी हारले
काय मिळाल कुणाला

मेणाची बाहुली होते
दगड बनून गेली ही वेळ
बहरलेल्या फुलांची फांदी होते
मी पुजेच फूल  होते
नियती चा हा खेळ कसा फुलच्या पाकल्या करुन गेला

मी ही कुणाला  आपले मानल होते
माझे पण काही स्वपन होत
सारे स्वप्न तोडून गेली
आपले माणसे दुराऊन गेली
ही वेळ अशी का आली ?

क्षणभर पहुडले होते मी
माझी झोप उडवून गेली वेळ
अस वाटत वेळ पुन्हा यावी
ती माझ्या मरणाची वेळ
असावी

ना कुणी आता माझ आहे
ना काही आता स्वपन आहे
वेळेने सर्व नायनाट् केला
आता वेळ फ़क्त अखेरच्या निरोपाची
आता वेळ फक्त आखरेच्या निरोपाची

          दुर्गा वाड़ीकर 

हरेश

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना, बघ जरा तरी