भयभीत मी देवाच्या दारी

Started by विक्रांत, January 17, 2015, 11:46:53 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

भयभीत मी
देवाच्या दारी
नम्र वाकला
शंकित जरी

अनेक आशा
बाळगत अंतरी
अडाणी कळपी
होवून बाजारी

आज नाही तर
उद्याला तरी
दयाळू पावेल
देव कधीतरी

तुष्ट्वत पुजारी
टाळीत भिकारी
पुनःपुन्हा जात
राहिलो मंदिरी

लोचट मनी
नवस उधारी
येताच शंका
गजर करी

विक्रांत प्रभाकर