तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

Started by Vaibhav Jadhav VJ, January 18, 2015, 04:30:04 PM

Previous topic - Next topic

Vaibhav Jadhav VJ

कविता :- तो दिवस होता,अन् ती रात्र होती.
कवी :- वैभव यशवंत जाधव.(V.J.)

मी जात होतो,ती येत होती
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.
दोघांना भेटायच होत,पण तो क्षण नव्हता
कधी यायचा क्षण,पण माणसे असे भोवती
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

दोघांना सांगायचे होते मनातले
शब्द फुटत नव्हते ते ओठांतले
नव्हती गोष्ट ती छोटी-मोठी
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

लांबले ते क्षण
तरी एक होते मन
तुझ्याविना कठीण ते जगणं
अन् कठीण ते मरणं
मनात जागा एकच ती
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

दोन जिवांचा एक जीव
कधी येईल माझी तुला कीव
होती ती जागा राखीव
त्यात लिहील होतं तुझं नाव
फक्त तु मला एकदा भेटती
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

बोलायचे होते मला
कुणीच नव्हते तिच्यासोबती
शोधिले मी तिला
पण ती कुठेच नव्हती
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

स्वप्न पडते मला
ती असते माझ्या बाजूला
एका शब्दात सगळ सांगते
गोष्टी त्या मनातल्या
पण होती ती स्वप्नपुर्ति
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

नाही हिम्मत माझी
तिच्याशी बोलण्यात
काहीच उरले नाही
तिला म्हणण्यात
नशीब माझे मलाच विचारती
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.

कधी येईल तो क्षण
भरुन जाईल माझे मन
दोघांच्या मिलनाने
निघून जाईल ते 'पण'
माझे मन मलाच सांगती
तो दिवस होता,अन् ती रात्र होती.
Miss You........