जगणं

Started by Vaibhav Jadhav VJ, January 18, 2015, 04:45:57 PM

Previous topic - Next topic

Vaibhav Jadhav VJ

कवितेचे नाव :- ' जगणं '....!
कवी :- वैभव यशवंत जाधव.

आहे तुझविन कठिण जगणं
कसं येणार मला मरणं,
जीवनात नाही रस तुझविन
तुझ्यासाठी जगणं हेच एक कारणं..

नसते काम माझे स्वार्थासाठी
भरते मन माझे प्रेमापोटी,
जगलो फक्त त्या क्षणासाठी
जगणं माझं फक्त तुझ्यासाठी..

उठतो तुझं स्वप्न घेऊन
जातो दिवस तुला पाहून,
आवडतं मला तुझं हसणं
त्यातच आहे माझं जगणं..

तुझविन कसं असणार ते 'जगणं'
जणू काळे नभ नसता पाणी पडणं
जणू चार भिंतीत कोंडून मरणं
नाही आत्मा म्हणूनि शरीर पंगू होणं
सुख-दु:ख नसता अश्रू गळणं
न बोलता,न ऐकता,दगडमूर्ती बनणं
न बघता स्वप्न रंगवणं......!!!
from
V.J.