फोनवरचं बोलणं..

Started by Vaibhav Jadhav VJ, January 18, 2015, 09:36:53 PM

Previous topic - Next topic

Vaibhav Jadhav VJ

कवितेचे नाव :- फोनवरचं बोलणं..
कवी :- वैभव यशवंत जाधव.

तुला न वेळचे भान
तुला न पैशांचा विचार,
बोलता- बोलता भरे मन
गोष्टी त्या दोन अन् चार.

समोर असता
तुझं काही न बोलणं,
न सांगता, न बोलता
तुझं सोडून जाणं,
अन् सांगे हजार कारणं
असे तुझं ते फोनवरचं बोलणं...

असता कोणत्या क्षणी
वाटे तुला भिती,
फोनवर माझ्याशी बोलुनि
दूरावली ती स्थिती..

असे रोज चॅटिंग मेसेजची
तरीही तू फोन करतेस,
गुड डे, टेक केअर अन्
शेवटी मिस यू म्हणतेस,
लाडागोडीचे ते बोलणं
असे तुझे ते फोनवरचं बोलणं..

होता तुझ्याशी भांडणं
असे तुझं ते रूसणं,
करूनि फोन मला
असे तुझं ते रडणं,
करे मी विनवण्या
असे तुझं चिडणं,
वाचुनि sms माझे
हळूच असे तुझं ते हसणं..

'' काही गोष्टी
येई फोनवर बोलता,
अन् काही गोष्टी
असे समोर बोलता..''