'आमचा बाप'

Started by Shivshankar patil, January 22, 2015, 12:28:29 PM

Previous topic - Next topic

Shivshankar patil

जीवंतपणी तु सळसळते चैतन्य
डगमगला नाही कसल्या संकटाना
अहवाने स्विकारलीस तु निधड्या छातीने
अठरा विश्व दारिद्र्यातही तु
तेवत ठेवली शिक्षणाची ज्योत
अमाप कष्ट अमर्याद हाल
होता परमेश्वर तेंव्हा का गहाळ ?
दारिद्रयातही स्पूलींग चेतवली
परोपकाराने दिली स्वार्थाला तिलांजली
श्रद्धा तुझी फक्त कर्मावरती
नाही ठेवली आस तु कोणावरती
आला यम दारी,अलिंगण दिले तयासी
आनंदाने आशिर्वाद आम्हास देऊनी
निरोप घेऊनी झाला तु स्वर्गवासी
दुखःचा डोंगर कोसळला आम्हावर
खांद्यावर मान ठेवूनी आश्रू ढाळायाला
उरले नाही आता कोणी...


शिवशंकर पाटील
वरिष्ट तुरूंगाधिकारी
९४२१०५५६६७