बायको

Started by केदार मेहेंदळे, January 22, 2015, 04:56:42 PM

Previous topic - Next topic

केदार मेहेंदळे

सुखात येथे जगतो त्याला कारण बायको
मनांत माझ्या, सदाच आहे, गोंदण बायको

पुरले उरले, पैसा अडका, देणे घेणे
जोडून ठिगळे, चादर शिवते, दाभण बायको

येता संकट, कधी अचानक, घर पिलांवर,
नवस बोलुनी, जीव ठेवते, तारण बायको

नाती गोती, येणे जाणे, सखे सोयरे
नात्यांच्या या, पुर्ज्यां मधले, वंगण बायको

ताट संपता, पुसून घेतो, बोट चाखतो
चविष्ट रुचकर, असे बनवते, जेवण बायको

खळखळ ऐकून, मला समजतो, मूड सखीचा
मधुर बोलते, शब्दाविण ते, कंकण बायको

अबोल होते, रुसून बसते, टिपे गाळते
मला आणते, भलते तेंव्हा, दडपण बायको

प्रेमळ सालस, मधुर भाषणी, कनवाळू ती 
पहाट वारा, श्रावण धारा, शिंपण बायको

व्रत वैकल्ये, पूजा अर्चा, उपास सारे   
दारा पुढचे, सारवलेले, आंगण बायको

आयुष्याची, रखरख सारी, सुसह्य करण्या 
आनंदाने, झिजते माझी, चंदन बायको


केदार ...

Çhèx Thakare