माझी परदेश वारी!

Started by designer_sheetal, January 23, 2015, 01:41:54 PM

Previous topic - Next topic

designer_sheetal

परदेशी जाणं ही आजकाल भलतीच कॉमन गोष्ट झालीय. ग्लोबलायझेशनमूळे जग इतकं लहान झालय कि प्रत्येक घरातून कमीतकमी एक तरी व्यक्ती आजकाल परदेशी असते. अहो लोक आजकाल कुठेकुठे जातात रशिया पासून अगदी अंटारर्टिका पर्यन्त. लोकांच्या पर्यटनाला सीमाच नाही उरल्यात. मी तर असं ऐकलय परदेशात काही हौशी पर्यटक वाटेल तेवढे पैसे मोजून जीवावर उधार होवून स्पेस वॉकलाही जातात.
असो! पण एखाद्याला परदेशवारीत अजिबात इंटरेस्ट नसेल तर???

(सकाळची वेळ ब्रेकफास्ट टेबलवर)

आई - अहो ऐकलत का? त्या साठे बाईंचा धाकटा मुलगा MS करायला अमेरिकेला चाललाय म्हणे, त्यांचा मोठा मुलगाही तिथेच आहे गेली २ वर्ष. आता धाकटाहि   जातोय..... त्या वैद्यांची मुलगी गेल्या आठवड्यात लंडनला गेली.

बाबा - हो ना? बघ लोकं कुठेकुठे जातात....  अनू, तू अजून इथेच. तुला कोणीच कुठे बोलवत नाही का? काय उपयोग तुझा MNC मध्ये असून? वर्षानुवर्ष तू इथेच. तुझ्या मित्र-मैत्रिणींकडे बघ. सगळे फॉरेनला आहेत

अनू - झालं का तुमचं परत सुरु? अडचण झालीय का माझी तुम्हाला? काय वाईट आहे इथे. चांगली नोकरी आहे, उत्तम पगार आहे. अर्ध्या तासावर ऑफिस आहे. अजून काय हवय?

आई -  बाहेर जाशील तर अजून स्मार्ट होशील. स्वतः ची कामं स्वतः करायला शिकशील. इथे काय ऑफिस हून येवून खायचं, प्यायचं आणि झोपायचं.

अनू  -  असतात काही काही लोकं लकी.  कशाला मी सुखाचा जीव दूखात घालू? बाहेर गेल्यावर एकट रहा. ऑफिस मधून येवून जेवण करा. मला साधा कूकर पण लावता येत नाही. किती दिवस बर्गर आणि स्यांडविच खाऊ? भांडी कोण घासणार? मला नाही जमायचं. मी इथेच बरी

बाबा - तुझ्यानी काही नाही होणार... इथेच रहा तू!

अनू - (स्वतःशीच) काय यार यांची रोजची कटकट. दर वेळेला कोणी आजूबाजूचे परदेशात गेले कि हि लोकं माझ्यावर घसरतात. आता तर मी यांना कुठेतरी जावूनच दाखवेन!

एक महिन्यानंतर
-----------------------------

(सकाळची वेळ ब्रेकफास्ट टेबलवर)

अनू - आई मला दुबईला नोकरी मिळतेय MNC मध्ये. चांगलं प्याकेज आहे.

आई - हे काय आता नवीन?

बाबा - त्या वाळवंटात काय आहे तुझं काम? रहाणार  कुठे? ऑफिस देणार का?

अनू  - ऑफिस फक्त १५ दिवस देणार मग स्वतःच स्वतः बघायचं.

बाबा - म्हणजे भाड्याने राहायचं किवा शेअरिंग मध्ये. घराचं भाडं, प्रवासाचा खर्च, जेवणाखाण्याचा खर्च.
मग काय उपयोग एवढ्या लांब जावून. इथे तूझं काय वाईट आहे? जवळच नोकरी आहे, प्रवासाचा फारसा खर्च नाही? शिवाय एकट राहायला जमणार आहे का तूला?

अनू  - अहो किती लोकं जातात नोकरीसाठी. माझे सगळे फ्रेंड्स बाहेर आहेत.

आई - त्यांना जमत असेल, तुला जमणार आहे का? जेवण तरी करता येतं का तूला? परत आमच्या जीवाला घोर तो वेगळा. हे नसतं खूळ डोक्यातून काढून टाक.

अनू  - मग काय करू त्या दुबईच्या ऑफरचं?

बाबा - नाही जमणार म्हणून कळवून टाक.

अनू  - ;) (स्वतः शीच)

आमच्या घरीही थोड्याबहोत फरकाने हे असच होत असतं. तुमच्या बाबतीतही झालंय का कधी असं?

शीतल
http://designersheetal.blogspot.in/