का छळते...

Started by Pravin Raghunath Kale, January 24, 2015, 10:31:20 PM

Previous topic - Next topic

Pravin Raghunath Kale

का छळते...

का छळत राहते
तू अशी मला
कधी स्वप्नात कधी
समोरच छळते मला

समोर येता अचानक
हळूवार स्माइल देते
तुझ्या त्या स्माइलने
काळजाची धडधड वाढते

रात्री मध्यरात्री स्वप्नात
हळूवार अचानक येते
नकळत मग झोपेवरही
तूच ताबा घेते

रात्र सरत जाते
मी जागाच असतो
दिवस मावळून जातो
मी झूरत राहतो
फक्त तुझ्यासाठी....

कवी : प्रविण रघुनाथ काळे
मो. 8308793007