गुंता

Started by anuswami, January 28, 2015, 11:10:51 AM

Previous topic - Next topic

anuswami

**  गुंता  **


नजरेत तुझ्या काय जाणिले मी
चुकला नकळत हृदयाचा ठोका
तुझ्या मनीचा ठाव कसा घ्यावा
समजत नव्हतं आहे प्रेम की धोका



तुझ्या इश्काची इंगळी डसताना
माझ हृदय खुदकन हसायच
तुझ्या मनात खरच काय आहे
मजला कधीच नाही ग समजायच



कधीतरी तू बोलावस मनसोक्त
यासाठीच तळमळायच ग माझ मन
तुझ्याच प्रेमात झुरुन झुरुन
विरुन गेलं ग सारं गगन



भावनांना माझ्या मिळावी सावली
ठेवून होतो ही एकच आशा
तुज प्रेमप्रवाहातच करपल्या भावना
अन पदरी पडली तिच निराशा



गुज माझ्या अंतरीचे तुला
कधीच नाही ग उमजल
जिंकून सुद्धा हरलो मी तुझ्या प्रेमात
पण तुला कधीच नाही समजल



तुझ्याविना मी कसा जगीन
याचा कधीतरी तू विचार कर
अश्रुंना माझ्या झेल कधी तू
भावनांच तुझ्या खुल दार कर



जे घडायच ते घडून गेल
चुकल असेल काही तर माफ कर
गैरसमजुतीला प्रेमात नको ठाव
तुही आपल मन साफ कर



रुसवे फुगवे तर चालतच राहतात
विश्वास माझा सखे तोडू नको
वाईट वेळ आली कितीही
माझा हात सखे तू सोडू नको



पुन्हा भावनांच भरलय आभाळ
तरीही गातो मी विरहाचेच सूर
तुलाही अन मलाही माहीत
जाणार एक दिवस आपण खुप दूर



शब्दही कमी पडतात भावना मांडायला
शेवटी एकच कर तू जाता जाता
प्रेम, आठवण, विरह की जीवनभर तुझीच साथ
खरच तू सोडवून जा हा गुंता
            सोडवून जा हा गुंता.......

कवी : अनिकेत स्वामी, अकलूज
asswami0143@gmail.com