लग्न

Started by धनंजय आवाळे, February 17, 2015, 02:35:42 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

वय कधी निघून  गेले कळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही

खूप झाल्या भेटीगाठी अन् बघण्याचा कार्यक्रम
चहा पोहे बिस्कीटात निघुन गेले मोसम

पसंतीचे सूर काही मिळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही

गृहशांती मंगळशांती  पितृशांती केली
एवढी तपश्चर्या ही न फळास आली

पञिकेचे सकंट काही टळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही

आता वाटे सगळे सोडूनीया द्यावे
भगवे वस्त्र लेवूनिया हिमालयी जावे

न कळे पुण्य कसे फळलेच नाही
लग्नाचे बंधन काही जुळलेच नाही

Dnyanesh Gurnule

marthii khub chan ...I like it

NARAYAN MAHALE KHAROLA

तुझ्यातच काही तरी दोष असणार नाही तर असे कोणासोबत होत नाही

धनंजय आवाळे

तुमचा विनोद बुध्दीशी संबध आहे का?

संजय

आता वाटे सगळे सोडूनीया द्यावे
भगवे वस्त्र लेवूनिया हिमालयी जावे
.
.
.

हिमालयात थंडी कडाक्याची असे
भगव्या एका वस्त्राने
     थंडीनिवारण होणार कसे?

Pramod kardel

are to shadi.com var registration kar nakki kanitari bhatin.


लीला

गृहशांती मंगळशांती  पितृशांती केली
एवढी तपश्चर्या ही न फळास आली


करावी तपश्चर्या बुद्धासम
बोधिवृक्षाखाली सहा वर्षे
एकाग्र चित्ते करत चिंतन
लग्नाच्या बोहल्याचे रात्रंदिवस