"ध्येयाने पेटलेला माणूस" (गद्य)

Started by nitinkumar, February 20, 2015, 03:31:13 PM

Previous topic - Next topic

nitinkumar

"ध्येयाने पेटलेला माणूस" (गद्य)

उघड्या डोळ्यामधल्या स्वप्नांना मी डिवचतो
कधी खिजवतो त्यातल्या स्वप्नपुरुषाला
आणि सांगतो भान ठेवायला पुढील संकटांचे
काट्यांवर पाय ठेवला कि काटे टोचतातच
आणि मग मऊ गालिच्यांचे मर्म रहात नाही
राहतात ती उरलेली स्वप्ने आणि बोचणारे काटे
आणि राहतात स्वकीयांचेच फेकलेले दगड!
मग हे स्वप्न पाहायचेच कशाला? वेदनेतून होणाऱ्या आनंदासाठी?
नसेल तर समाधानासाठीच बहुदा....
हे मनाचं झालं! पण....
अंतर्मनाचं काय? ध्येयाने पेटलेल्या आणि आसक्त झालेल्या माणसाला पाहिल्यावर
त्यालाही वाटतच असेल ना! कि बघू पुन्हा एकदा....
"स्वप्न पाहून"....


- नितीनकुमार