बेरंग झालेल्या आयुष्यात...!!

Started by सुरेश अंबादास सोनावणे....., February 20, 2015, 08:11:08 PM

Previous topic - Next topic
बेरंग झालेल्या आयुष्यात...!!

बेरंग झालेल्या आयुष्यात,

थोडे रंग भरावे म्हणतो.....

मी माझ्या एकांताला,

थोडे एकटे सोडावे म्हणतो.....

विसरुनी जरासे दुःखाला,

थोडे सुख भोगावे म्हणतो.....

थांबवूनी जाणा-या वेळेला,

थोडे निवांत बसावे म्हणतो.....

हरपून देहभान पुर्णता,

नव्याने आयुष्य जगावे म्हणतो.....
.♥.  :-D  .♥.  :-D  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २०/०२/२०१५...
सांयकाळी ०८:०६...
©सुरेश अं सोनावणे.....