नेत्याची तिजोरी

Started by गणेश म. तायडे, February 23, 2015, 11:50:38 AM

Previous topic - Next topic

गणेश म. तायडे

नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा
उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,
तुझ्या कर्मापायी नेत्या केले किती तु अकर्म,
सोड हि पापाची खिडकी उघड पुण्याचे हे द्वार...

नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा
उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,
तुझ्या टोपी पायी नेत्या केले किती तु घोटाळे
सोड हा धर्माचा नाद कर बंधुतेचा प्रसार ...

नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा
उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,
तुझ्या खुर्चीपायी नेत्या केले किती तु अनर्थ
सोड श्रीमंतीचा साथ दे गरीबाला तु हात...

नेत्याची तिजोरी पैशांचाच ठेवा
उघड मन नेत्या आता उघड मन नेत्या,
तुच्छ लोक पाहे तुला ऐक माझे तु हे बोल
चाल माणुसकीची चाल मग लोक म्हणतील तुला...
नेत्याची तिजोरी बंधुतेचाच ठेवा
उघडेच राहू दे नेत्या उदारतेचे हे द्वार....

- गणेश म. तायडे
    खामगांव
   ganesh.tayade1111@gmail.com