ती

Started by धनंजय आवाळे, February 25, 2015, 10:46:11 AM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

ती कुठेही भेटते
रानात
वनात
झाडाच्या पानात

ती कुठेही बोलते
वाटेत
पेठेत
सागराच्या लाटेत

ती कुठेही असते
घरात
दारात
लागलेल्या सूरात

ती कुठेही हसते
मनात
कानात
आतल्या प्राणात

ती कुठेही बसते
अंगतीत
पंगतीत
भावनांच्या संगतीत

ती कुठेही नाचते
अंगणात
प्रांगणात
प्रतिभेच्या रिंगणात

कविता कुठेही सुचते
आचारात
प्रचारात
तिच्याच विचारात