नात हे नात असतं ….

Started by shubhy02, February 25, 2015, 11:13:58 PM

Previous topic - Next topic

shubhy02

नात हे नात असतं
एग्रीमेंट वरती होत नसतं
जस आमच तुमचं
तसच इतरांचंही जरा सेमच असतं
तर कधी कधी थोडं  डीफ्रंटही असतं
पण नात  हे नात असतं
एग्रीमेंट वरती मुळीच टिकत नसतं

एकाने ताणल तर दुसऱ्याने सैल सोडायचं असतं
दुसर्याने ताणल  तरी पहिल्याने अलगद पकडायचं असतं
कितीही काही झाला तरी एकत्र जोडून ठेवायचं असतं
त्यासाठी आधी मनातल्या इगोला तोडायचं असतं
कारण नात हे नात असतं
केवळ एग्रीमेंट वर टिकत नसतं

तुटायला आल तरी तुटू द्यायचं नसतं
कोणी जोडायला आला तर त्याला रुसू द्यायचं  नसतं
फुलावरल्या फुलपाखरा सारखं ,
तळहातावरच्या गुलाबी पाकळीगत
दवाबिंदुला जपायचं असतं
कारण ,नात हे नात असतं
नुसतं एग्रीमेंट वर सरत नसतं

आईच्या कुशिमधल इवलूस बाळ असतं
खिल्खिळून हसतं ,रमत असतं ,
तर कधी हट्टाला ही पेटलेलं असतं
खट्याळ कारट्या सारखं जरा कधी तरी लाडावलेलं असतं
त्याला प्रेमाने गोंजारून हृदयाशी कवटाळायचं असतं
कारण ,नात हे नात असतं
एग्रीमेंट करून संपत  नसतं
ते आपल्या हयातीनंतर ही चिरंजीवी असतं ...
नात हे नात असतं ....


                                                   Author:
                                                     शुभम शेट्ये ,
                                                     स्वताःच  स्वतःशी ..