जवळ येते, खेटून जाते. अलगद नखेरेल नार

Started by NARAYAN MAHALE KHAROLA, February 26, 2015, 09:10:17 PM

Previous topic - Next topic

NARAYAN MAHALE KHAROLA

लागताच चाहूल
उघडते दार
नजर तिची
मादक फार
जवळ येते
खेटून जाते
अलगद नखरेल नार

चेहऱ्यावरती
धुंद नशा
बघून बावरती
दाही दिशा
मादक अश्या
नजरेत जिच्या
सगळेच होतील ठार
जवळ येते
खेटून जाते
अलगद नखरेल नार