ठोके माझे चुकवलेत तु

Started by manishshinde, February 27, 2015, 12:11:20 AM

Previous topic - Next topic

manishshinde

ठोके माझे चुकवलेत तु,
जे एके काळी मोजले होतेस ,
भान नव्हते मला,
जेव्हा तु प्रेम व्यक्त केले होतेस...

आठवते आजही एखाद्या तु कातरवेळी,
रमतो मी त्या त्या सायंकाळी,
अनुभवून सारे हेे सुखाचे डोंगर,
हसायचीस तु कीती स्वछंदी आणि मोकळी...

करतो आजही प्रेम तीतकच तुझ्यावर,
करायचीस तुही तीतकीच,
ना थोड खाली , ना थोड वर,
पण फक्त तुझ्या मनावर,
अन् माझ्या ह्रदयावर...

रमायचो कधी तुझ्या सुरात,
गुंतवून ठेवायचीस मला तुझ्या स्पंदनात,
मजा यायची कधी तुझ्या चक्षुंत बुडण्यात,
यायची मजा पेरलेले उगवतांना बघण्यात...

मी आणलेला cake,
तु मोठ्या जोमाने cut केला होतास,
पेस्स्ट्री चा एक बोट तु,
हळुच माझ्या गालावर टेकला होतास...

तो एक वेगळाच आनंद होता,
सगळ्याच कामात एक वेगळाच उत्साह होता,
कडकडत्या ऊन्हाळ्यातही,
गुलाबी थंडीचा भास होता...

आजही गाडी माझी तुझ्यावाचुन अडकतेय,
तुझ्याविना जगण्याची,
या वेड्या मनाला सवय लागतेय
तुझ्याविना जगण्याची,
या वेड्या मनाला सवय लागतेय...

रंगकवी:- मनिष शिंदे... :'(