पहाटे केंव्हातरी....

Started by शिवाजी सांगळे, February 28, 2015, 04:30:15 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

पहाटे केंव्हातरी....

पहाटे केंव्हातरी स्वप्नांचा आरसा फुटलेला...

सावरताना ढळता दुपट्टा,
केसातून तुझा गजरा आेघळला

रागावुन थोडसं....मी म्हणालो
मर्यादा असते..... वेंधळेपणाची   

तेंव्हा रोखुन नजर, उडवीत दुपट्टा...
चेहरयावर तुझ्या रक्तीमा आला

पहाटे केंव्हातरी स्वप्नांचा आरसा फुटलेला...

पाहतोय मी... तेंव्हा पासून,
तूझं रूसणं नि रागावनं ... 
त्या साठी जे नव्हंच मुळी...
तरीहि धरलास तु अबोला?

पहाटे केंव्हातरी स्वप्नांचा आरसा फुटलेला...

समजलाच नाही कधी अन्
उमगला सुध्दा नाही?
मला तो दुरावा...
विना भांडणाचा, शिल्लक उरलेला...

पहाटे केंव्हातरी स्वप्नांचा आरसा फुटलेला...

©शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९