अमावस्याच्या रातीच भूत

Started by sanjay limbaji bansode, March 03, 2015, 06:01:39 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

अमावस्या आली की भीती मला वाटते
भितीचे थैमान माझ्या मनात दाटते !

रात्र झाली की, देव्हाऱ्यात घेतो धाव
सारखे पुटपुटत असतो देवाचे नाव !

भीतीने मनात येते विचाराचे ऊत
घाबरवते मला त्या चिंचेवरचे भूत !

रात्र असते भयाण, कीडे करतात किरकिर
आवाजाने माझे, डोळे होतात भिरभिर !

जाता जाता माथारा,बोलून मज गेला
दारासमोर तुझ्या राम्या बेवडा मेला !

शेजारीन बाईच्या अंगात येते मरीमाय
अमावस्याला रात्रभर करत बसते हाय हाय !

स्मशानवट्यातून ओरडते,जोरजोरात टीटवी
अमावस्याच्या अर्ध्या रात्री उठून बसली सटवी !

मधेच जोरजोराने पुन्हा कोल्हभुक होते
अर्धा माझा जीव,तेंव्हाच मरून जाते !

घरासमोर माझ्या  कुत्र इवळत बसलं
समजलं मला आता गावात भूत घुसलं !

देव जाणे आता भुताला कोणते घर दिसणार
कुणाच्या अंगात आता पुन्हा भूत घुसणार


संजय बनसोडे