माझ्या मनाचा आरसा

Started by kshitij samarpan, March 05, 2015, 12:29:12 AM

Previous topic - Next topic

kshitij samarpan

माझ्या मनाचा आरसा ,
कधी पाहशील तू?
त्यात गीत तुझे असतील ,
मिठीत माझ्या गुण गुणलेले तू,,,,,

माझ्या मनाचा आरसा ,
जरी पाहशील तु ,
प्रतिबिंब तुझे पाहुन ,
माझीच आहेस हे ओळखशील तु ...

माझ्या मनाचा आरसा ,
त्यात   निखळ पाण्याचा झरा तु ,....
सुरवात तुझी हृदयात माझ्या ,
नसा  नसात विरून जाशील का तू?

माझ्या मनाचा आरसा ,
तुला शोधून काढेलच , ...
नजरा  चोरून मला टाळून  जाशील तु ,
तेव्हाही  सावली तुझी,  माझीच असल्याचे अनुभवशील तु ......


क्षितीज समर्पण

n deshmukh

माझ्या मनाचा आरसा तुला शोधून काढेलच...nice one...