ज्यासी नाही आत्मा

Started by sanjay limbaji bansode, March 05, 2015, 08:38:41 AM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

ज्यासी नाही आत्मा
तया कैसा दिसे परमात्मा !

जो असे सदैव पापात दंग
तयाला कैसा दिसे पांडुरंग !

जो करे प्राण्यांचा मांसाहार
त्यासाठी कोण उघडी स्वर्गाचे दार !

जरी मुखी हरिनामाचा शोर
मनी तयाच्या असे चोर !

जीवित माय बापाची नसे जाण
मेल्यावर तयाला का करती पिंडदान !

झाला दैववादी लाऊनी टीळा
वरून दिसे सभ्य आतूनी असे काळा ! !

संजय बनसोडे