तुझ रुप

Started by Aniket pawar1, March 05, 2015, 12:19:24 PM

Previous topic - Next topic

Aniket pawar1

पुनवेचा तु ग चंद्र , शुक्राची तु ग चांदणी
नभात आहे ध्रुव तारा , नेत्रात तुझ्या दिसे सर्व पसारा

भुवई तुझी चतुर्थीची ,नेत्र बाहुली चांदणी सारखी
ओठ जणु इंद्रधनु गाल जणु त्यातील रंग
हस्यात त्याचा प्रकाश होतो बुलंद

झाडे,पाने,फुले,फळे,वेली सर्व बहरुन जाती
जेव्हा तुझ्या या काळ्या कुरुळ्या केसांसारख्या नभातुन थेंब गळती

वाहणारया नदीतुन हिरा जेव्हा धुवुन निघतो
तुझ्या नाकात शोभुन दिसतो

लाल चटुक ओठ इंद्रधनुचे अस्ति
उमलताच गुलाबी गालावर खळी येती

या निसर्गात डोंगर दरया अनेक अस्ति
त्यात नाक नक्षी मज तुझीच दिसती