डोळ्यांत माझ्या...

Started by hrishi gaikwad, March 07, 2015, 12:06:22 AM

Previous topic - Next topic

hrishi gaikwad

डोळ्यांत माझ्या काही अंधूकसे दाटत असे,
नजर तिकडे झेपावताच् नाहीसे होत असे,
भासा परि भास हा कि ह्रदयाचा ध्यास म्हणावा,
काळोखातील काजवा कि आशेचा किरण म्हणावा,
अग्निला पेटावणारा निखारा कि अग्निचाच् शेवटचा अंश म्हणावा यास्...

डोळ्यांत माझ्या काही अंधूकसे दाटत असे,
शब्द ओठांतले डोळ्यांत साठत असे,
आठवणीँच्या पावलांचे ठसे जणू काळजावर उमटत असे,
मनातल्या आठवणी आठवणे कि आठवणीँतले मन आठवणे म्हणावे ,
क्षण भंगूर हे जीवण सुखासाठी गमवावे कि मिळालेल्या क्षणात आनंद शोधणे म्हणावे यास्...

डोळ्यांत माझ्या काही अंधूकसे दाटत असे,
फसव्या दुणियेत ह्या फसल्या सारखे वाटे,
हसण्यासाठी जगणे कि जगण्यासाठी हसणे म्हणावे,
आपल्या माणसांचे अनोळखी चेहरे कि अनोळखी चेहऱ्यात आपलेपण शोधणे म्हणावे,
दूर काळोखात मन माझे हरवलेले भासे,
अनोळखी वळणावर वळालेले दिसे,
जिवणाच्या वाटेवर दिशाहिण होणे कि दिशाहिण वाटेवरचे जगणे म्हणावे यास्...

डोळ्यांत माझ्या काही अंधूकसे दाटत असे,
मरणाच्या दारात जगण्याची आस दिसे,
जीवणाची नागमोडी नदि कि दुख्खाःने साठलेले छोटेसे डबके म्हणावे,
जगण्याला कंटाळूण मरणाच्या सागरात विलीण होणे कि उंचावरुण कोसळूण जिवणाचा मनसोक्त आनंद लूटणारा धबधबा म्हणावा यास्...

डोळ्यांत माझ्या काही अंधूकसे दाटत असे,
नकळत डोळ्यांच्या पापण्या पाणावत असे.......

(Hrishi g)
9096979740