तुझ्या विचारांची भरती-आहोटी...

Started by hrishi gaikwad, March 07, 2015, 12:48:49 AM

Previous topic - Next topic

hrishi gaikwad

तुझ्या विचारांची भरती-आहोटी सुरु असते ह्या सागर मनी;
सागराच्या लाटांवर आता तुझेच् नाव लिहायचेय्...

वादळीस्वप्ने भरकटवू लागतात जीवा;
तुझ्या हृदयाच्या काठावर आता स्थिरावायचेय्...

समुद्राच्या रेतीत तुझ्यासवे माखायचे;
समुद्रकाठी रेतीचेच् आता एक छोटेसे घर बनवायचेय्...

काठावरच्या शिँपल्यांगत् तुझे हरएक स्वप्न वेचायचेय्;
शिँपल्यांच्या दागिण्यांनी तुला आता सजवायचेय्...

तुझा हात हातात घेऊन समुद्रकाठी फिरायचेय्;
रेतीतील तुझ्या पावलांचे ठसे हृदयी आता उमटवायचेय्...

वाऱ्याची मंद झुळूक तुझ्या केसांला स्पर्श करुण जाते;
तुझ्या माझ्या प्रेमाचा गारवा समुद्रकाठी पसरवते...

तुझ्या श्वासांची ऊब मला आता अनुभवायचीय्;
प्रेमसागराच्या ह्या काठावर तुला मिठीत घ्यायचेय्...

सुर्य असा अस्ताला जाता आसमंत लाल रंगी माखलाय्;
तुझ्या चेहऱ्याच्या शुभ्र चांदण्यात मला आता भिजायचेय्....