दुनिया जगायला शिकवते...

Started by hrishi gaikwad, March 07, 2015, 02:04:43 PM

Previous topic - Next topic

hrishi gaikwad

जिथे वडिलांचे छत्र डोक्यावर नसते;
लपन्यासाठी आईचा पदर ही नसतो ,
वाडिलांचा हात हातून सुटतो;
आईची माया जिथे नहिशी होते,
तिथे दुनिया जगायला शिकवते...

जिथे आई वडिलांच्या शिकवनिचि उणीव भासते;
जगण्यासाठी जराश्या आधारची कमी जिथे असते,
तिथे दुनिया जगायला शिकवते...

सुखाचि सवय असते;
दुःख सहसा बगिततलेलेच नसते,
जीवनात प्रेमच प्रेम भरलेले असते;
अन जिथे प्रेम ही दुःख देते,
तिथे दुनिया जगा यला शिकवते...

पोटाची खलगी भरायची म्हणून वाटेल ते करावे लागते;
कधी भाकरी तर कधी पाणी पिउन दिवस काढावे लागतात,
अन् जिथे पाण्यावर ही जगणेमुश्किल होते;
तिथे दुनिया जगायला शिकवते...

स्वार्थि जीवन हे स्वार्था साठीच जगावे लागते;
कधी स्वताःचे तर कधी दुसऱ्यांची मनेमोडावी लागतात,
अन् जिथे स्वार्थ ही जगने अनावर करतो;
तिथे दुनिया जगायला शिकवते...

जीवन म्हणजे दोन घडींचा डाव;
कधी मोडेल सांगता येत नाही,
जिथे मोडलेले डाव मांडने अशक्य होते;
तिथे दुनिया जगायला शिकवते.....

दुनिया जगायला शिकवते...