जाणिवांच्या जाळ्यात...

Started by hrishi gaikwad, March 07, 2015, 11:48:04 PM

Previous topic - Next topic

hrishi gaikwad

जाणिवांच्या जाळ्यात मन अलगद गुंतते,
स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करते,

विरहाच्या रेतीत हृदय अधिकच धसते,
पुढे चालणारे पाउल नकळत अडखळते,

विरलेल्या क्षणांचे काटे पायी रुततात,
आठवणींची ठेच लागता डोळे पानवतात्,

ओघळणारे अश्रू ओठांवर आटतात,
खूप काही बोलायचे असते;
पण शब्द पुन्हा एकदा मूके होतात्,

मग वाऱयाचि मंद झुळुक वाहते,
प्रेमाच्या गारव्याने मन शहारते,

स्वप्नरूपी ढग गगणि दाटून येतात,
ओसाड रानी वर्षा सरी बरसावतात,

वाळलेल्या पींपळ् पानी पुन्हा पालवी फूटते,
काटेरी वनात एक फूल गवसते,

प्रेम फुलांचा गंध जीवनी दरवळतो,
तुझ्या माझ्या प्रेमाचा इन्द्रधनु आकाशी उमटतो,

सप्त रंगात मन नव्याने रंगते,
जानीवांचे जाळे अता नाहीसे होउ लागते...