पानगळ

Started by धनंजय आवाळे, March 11, 2015, 01:18:33 PM

Previous topic - Next topic

धनंजय आवाळे

पानगळीच्या मोसमात
झाड उदास उदास
पक्षी उडुनीया जाता
घरटं भकास भकास


कोरड्या आभाळाला
ढगांचे आभास
मोकळ्या रानाचे
निशब्द झाले श्वास


वाळक्या गवताला
ना वार्र्या ची ही आस
ठिकरी उडाली
काळ्या कातळास


सुर्य बुडाला नभात
चरे पाडून मातीस
घेई झाकून अंधार
जळून गेलेल्या वातीस


पानगळीच्या मोसमात
मन गुंतले पानात
मिळे मातीस पाचोळा
पालवीच्या चिंतनात