असतीस तु जीवनी माझ्या...

Started by Rajesh khakre, March 12, 2015, 12:58:20 PM

Previous topic - Next topic

Rajesh khakre

असतीस तु जीवनी माझ्या
हे जीवन फुलले असते
सप्तरंगानी इंद्रधनुच्या
हे जीवन खुलले असते

हे ऐसे का घडावे
तुजसवे भेट न व्हावी
ही न्यूनताच केवळ
मम जीवनी रहावी
ही एकच सल मनाला रात्रंदिन बोचत असते

हे प्रेम तुझे नि माझे
सार्या जगताहूनी निराळे
होईल ते सत्य अथवा
स्वप्नच राहील सगळे
आभास नाही हा केवळ अंतःर्मन का म्हणते?

तुझ्याविन सखे गं
बाजार कसा हा भरला
कुठे शोधावे तुला मी
किती वेळ आता तो उरला
दिवस कलता थोडासा पालं- दुकानं उठते

नको मला हे जीवन
अन मेलेले ते मन
व्यर्थ जन्म हा माझा
भोगणे नशिबी सजा
कोमजलेले फुल ते पुन्हा कधि का फुलते

हे कसले जगणे असले
कोँडमारा तो मनाचा
दिन ढकलित ते जाणे
अन् पाढा आयुष्याचा
दोषारोप कुणावर त्यात मजा काही ती नसते

---राजेश खाकरे
Mo.7875438494
rajesh.khakre@gmail.com