का आपण मोकळा श्वास घेत नाही...?

Started by hrishi gaikwad, March 12, 2015, 11:51:19 PM

Previous topic - Next topic

hrishi gaikwad

का आपण आयुष्य एवढे अवघड करुण घेतो?
स्वताच्याच् बंधनात नकळत अडकत जातो,
परिस्थिति बदलते तसे
आपल्याला ही बदलावे लागते,

मग का हे मन मानत नाही...?

एखादी गोष्ट आपली होती
हेच मानत चालायचे का?
जर ती गोष्ट आपली असतीच
तर दूर गेलीच नसती,

हे का कळत नाही त्या वेड्या मनाला...?

तरीसुद्धा असफल असा प्रयत्न करायचा,
दिशाहीन वाटेवर चालायला निघायचे,
माहित असते ज्या वाटेवर निघालोय
तिला ना अंत ना कुणी सोबती,

तरिसुद्धा का मृगजळाच्या मागे धावायचे...?

त्या भूतकाळात
का स्वतःला अडकवत जायचे,
हो आयुष्य खूप छोटे आहे
पण संपले तर नाहीना,

मग का त्या आठवणीत सारे जीवन झुरत जगायचे...?

खूप काहि करण्यासारखे आहे ह्या जीवनात,
का त्या एका गोष्टीसाठी
जीवन वाया घालावयचे,

का कळत नाही आपल्याला
जीवनात सगळे मनसारखे झ।ले तर
जीवन जगायची मजा तरी काय?

संकटांचा सामना करत
परिस्थिति सोबत जूळउन घेणे,
दुःखी मना धीर देऊन
डोळ्यांतील अश्रू पुसून दुसरयांना हसवने,

सगळ्यांना नेहमी खुष ठेवणे
हेच तर खरे जीवन आहे,

मग का आपण जीवन जगत नाही,
आपल्या मनाला का आपण सावरत नाही...?

का आपण स्वतःवरची बंधने तोड़त नाही,
का आपण मोकळा श्वास घेत नाही...?