अधिर मन

Started by शिवाजी सांगळे, March 14, 2015, 04:41:27 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

अधिर मन...

आजकाल मन उगी अधिर होते
जशी अचानक सर पावसाची येते !!धृ!!

येते गारव्याचे घेवुन स्पर्श कधी
कधी ओजळीत अश्रु हळुच प्रसवते !!1!!
आजकाल मन उगी अधिर होते...

तोडून ऋतुंचे इंद्रधनु बंध सारे 
स्मृतीं शलाका आपसुक लकाकते !!2!!
आजकाल मन उगी अधिर होते...

वाहते मन गर्भरेशमी जळा संगे
आठवांचे लेवुन वस्त्र पुन्हा तरंगते !!3!!
आजकाल मन उगी अधिर होते...

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९