प्रेम म्हणजे मृगजळ......!

Started by Mayur Jadhav, March 15, 2015, 09:12:25 PM

Previous topic - Next topic

Mayur Jadhav

प्रेम म्हणजे मृगजळ....!

आठवणीत तुझ्या सखे शब्दच  सारे विरले
अन् आकांताने साद घालती नयने भान सारेच हरपले.....
नुसतेच तू सतत समीप दिसणे अन् भाव मात्र प्रीतीचे
मग हे प्रेम म्हणजे मृगजळ की बंध फक्त भावनांचे.....
शोधले मी खूप तुला पण हाती आले काहीच नसलेले
अन् आता मला कळून चूकले की माझे ह्र्दयच तूझे घरटे शांत विसावलेले.....
इंद्रधनुसम रंगीतसा मनात हट्ट करतेस तू पसरण्याचा
अन् सुमनासम दरवळ तूझा दाही दिशा की खेळ फक्त आभासाचा.....
सायंकाळच्या रंगांसम क्षण पसरवतेस तू मनात रात्रीचे
अन् मध्यान्हीच्या उन्हासम चटके देतेस मात्र खूप दूर असल्याचे.....
हे गहिवरलेले मन की रडणारे ह्र्दय की वाट पाहून थकलेले डोळे की अजून काही की हे खेळ सारे नियतीचे
अन् हे प्रेम म्हणजे मृगजळ की बंध फक्त भावनांचे.....
बंध फक्त भावनांचे..........

मयूर जाधव ,
कुडाळ , ( सातारा ) ,
8888595857.

विद्या

करुणरसाने चिंब भिजलेले हे कवन कालिदासाच्या 'रघुवंशा'तल्या अजविलापाच्या तोडीचे खास आहे.

Mayur Jadhav

मनापासून आभार विद्या आपले, आपण जे वर्णन केलेत तेही खूप भावनारे  आहे.