खडा टाकून बघावं म्हटलं

Started by विक्रांत, March 18, 2015, 08:35:48 PM

Previous topic - Next topic

विक्रांत

खडा टाकून बघावं म्हटलं
पाखरू भेटलं तर भेटलं
आणि गेलं तर जाऊ दे उडत
गेलं तर गेलं !
खरतर ते 
उडायचीच शक्यता
जास्त होती
अन घडलही तसच
पाखरू दूरवर निघून गेलं
डोळा मारून मी स्वत:ला
आगे बढो यार म्हटलो
हे तर नेहमीच आपलं
अन मोठ्यानं हसलो
पण कुणास ठावूक कसं
यावेळी काहीतरी
भलतंच असं होतं झालं 
फांदीवरून जे ते उडालं
थेट मनात जावून बसलं
आता मनात खडा
कसा मारायचा
हे कुणीच नव्हतं शिकवलं
अन तेव्हापासून दिवस रात्र
मनात तिच चिवचिव आहे
उजाड झाड उजाड फांदी
व्याकूळ हा जीव आहे 

विक्रांत प्रभाकर