नीळ्या आकाशी निळा शोभीला

Started by sanjay limbaji bansode, March 19, 2015, 03:24:03 PM

Previous topic - Next topic

sanjay limbaji bansode

निळ्या आकाशी
निळा शोभीला
भीमाच्या पिल्यांचा
मळा शोभीला !

पेरणी केली समतेची
एक नव्या जातीची
नातं जूळले बुद्धाशी
एक नव्या मातीशी
त्यात चील्या पिल्यांचा
गळा शोभीला
भीमाच्या पील्यांचा
मळा शोभीला !

रात दिस जागीलं
भीमाच्या मळ्याला राखीलं
प्रज्ञा शील करुणाचे
त्यात खत पाणी टाकिलं
भीमाच्या असंख्य पील्यांचा
त्यात लळा शोभीला
भीमाच्या पील्यांचा मळा शोभीला !

शूद्र जातीच्या रोपट्यांचा
नाही तेथे अन्याय झाला
वाढले भरभरून तेही
अज्ञानाचा विज्ञान झाला
हातात पेन,पेंसिल घेऊन
शिक्षणाचा फळा शोभीला
भीमाच्या पील्यांचा
मळा शोभीला !

संजय बनसोडे