प्रेमाची हि कथा

Started by prp1717, March 19, 2015, 04:51:00 PM

Previous topic - Next topic

prp1717

गाठ पडली ओळख झाली सर्व काही झाले
तुझ्या प्रेमात सख्या माझे भान हरपून गेले

कसे सांगावे हे तुला कळले नाही अजून
प्रेमाच्या या रंगरूपात मन गेले हरपून

उगत - उगत सूर्य कधी आस्तावला गेला
कळले नाही दिवसांमागे दिवस कसा गेला

मन दिले रुदय दिले अजून काय देऊ
सांग  सजना तुझ्यासाठी जीव कसा देऊ

कुठल्या गोष्टीत लक्ष्य लागेना फार मात्र चिडले
प्रेमात असे  काही होईल असे कधी न वाटले

सात फेरे घ्यायची आता इच्च्या मात्र उरली
संसार थाटावा तुझ्यासोबत आशा खूप दाटली

रंग रूप आहे मला नाही कमी कशात
तूच असावा स्वप्निदेखील हीच आस मनात

भीत भीत धरले मी गुलाबाचे फुल हातात
मन मोकळे करावे दाटून आले तनात

प्रेमाची हि कथा नको नाही या शब्दात
आस मनी धरून आले मी एक लाखात

सांग सांग माझ्या प्रेमाचा देशील का रे होकार ?
आयुष्यभराच्या साथीसाठी करशील का रे स्वीकार ?
                                  तू करशील का रे स्वीकार??


By- PRIYA

pallavi kamble

chhan kavita ahe.good,keep it up.

pallavi kamble

chhan kavita ahe.good.keep it up.

hrishi gaikwad

छान लिहिता तुम्ही....nyc