मनाचे काय ?

Started by sachinikam, March 20, 2015, 03:20:37 PM

Previous topic - Next topic

sachinikam


मनाचे काय ?

शिंपडले गोमुत्र
झाला परिसर पवित्र
मनाचे काय ? मनाचे काय ?

शिंपडले अत्तर
झाले सुगंधी वस्त्र
मनाचे काय ? मनाचे काय ?

माळला गजरा
झाले सुवासिक केस
मनाचे काय ? मनाचे काय ?

केला शृंगार
झाला देखणा देह
मनाचे काय ? मनाचे काय ?

-----
कवितासंग्रह: मुकुटपीस
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
-----