!! भाव शोध !!

Started by शिवाजी सांगळे, March 21, 2015, 04:31:30 PM

Previous topic - Next topic

शिवाजी सांगळे

!! भाव शोध !!

भोगाचिये ठायी ! प्राक्तनाचा ठेवा,
जाणोनिया सत्य ! विसरशी !!१!!

सुखाचिये अंतरी ! दुःखाचेच बीज,
उमगते सारे ! सकलांसी !!२!!

करी धावाधाव ! फुटेस्तोव उर,
क्षणिक मोहाच्या ! सुखा लागी !!३!!

शोध आत्म्याचा ! असे जो सहज,
शोधावा दर्पनी ! जळा परी !!४!!

भाव शोधण्याचा ! अंगी बाणल्यास,
दिसे परमात्मा ! परस्परां !!५!!

© शिवाजी सांगळे
©शिवाजी सांगळे 🦋papillon
संपर्क: +९१ ९५४५९७६५८९