कसे सांगू मी तुला...!!

Started by सुरेश अं सोनावणे, March 23, 2015, 09:32:57 PM

Previous topic - Next topic
कसे सांगू मी तुला...!!

कसे सांगू मी तुला,
की तु खुप आवडतेस मला,
जसे नदी आवडते
सागराला.....

कसे सांगू मी तुला,
का तु हवीहवीशी वाटतेस मला,
जसे चाँकलेट हवे असते लहान मुलीला.....

कसे सांगू मी तुला,
की एक क्षणही पाण्याशिवाय,
राहवत नाही माशाला.....

कसे सांगू मी तुला,
की तुझ्याशिवाय दुसरं,
काहीच सुचत नाही माझ्या मनाला.....

कसं सांगू मी तुला,
जसे देवाशिवाय दुसरं,
काही दिसत नाही भक्ताला.....

कसे सांगू मी तुला,
की ते तीन गोड शब्द,
सांगायचे आहेत मला तुला.....

कसे सांगू मी तुला,
जसे श्वासांची गरज,
भासत असते शरीराला.....

कसे सांगू मी तुला,
जसे पहिल्यांदा आई,
म्हणायचे असते बाळाला.....

तसेच तुझ्याशिवाय,
काहीच अर्थ नाही,
माझ्या या जिवनाला.....
.♥.  :-*  .♥.  :-*  .♥.

_____/)___/)______./­¯"""/­')
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯'\_,,,,,,,,­\)

स्वलिखित -
दिनांक २३/०३/२०१५...
रात्री ०९:२३...
©सुरेश अं सोनावणे.....

कामाक्षी

सांगू का कसे सांग तू मला
नको बाई, इश्‌श, लाज वाटे मला