मुकुलगंध

Started by sachinikam, March 24, 2015, 10:50:34 AM

Previous topic - Next topic

sachinikam

मुकुलगंध

ऋतू बहरला नवानवा वाटे मज हवाहवा
मखमली स्पर्शाचा शहरा, फुलवी मनी गारवा
उमटले हवेत अल्हाद, मधुर प्रीतीचे तरंग
प्रकटले भवताली, अलगद अस्मानाचे सुखदरंग
चाहूल हळुवार तुझ्या येण्याची, जुळू लागले रेशमीबंध
पाहुनी समोरी तुला लाभले सकल "मुकुलगंध"

चांदण्या गगनातल्या अंगणात उतरल्या
बनुनी सुमने प्राजक्ताची सोनसळी उमलल्या
हळुवार हलक्या हाताने ओंजळीत घेतल्या
मिटुनी डोळे जोडूनी कर देवाऱ्यात पूजल्या
अम्सानातून अवनीवर बरसला अमृतानंद
पाहुनी समोरी तुला लाभले सकल "मुकुलगंध"

कवितासंग्रह : मुखदर्पण
कवी: सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५