यशकळस

Started by sachinikam, March 25, 2015, 12:49:50 PM

Previous topic - Next topic

sachinikam

यशकळस

पहिल्या पायरीवरून यशाच्या कितीवेळा मी पडू
डोळे उघडून पाहू कसे आवरेना मज रडू

गमविलेला आत्मविश्वास कुठे कसा शोधू?
गलितगात्र झाल्यासारखे विचारही झाले अधू

अंधाराच्या जाळ्यामध्ये मती झोपली गाढ
विना प्रकाशसंश्लेषण कशी होईल वाढ ?

कधी कुठेतरी मनामध्ये जागेल का आशा ?
देवजाणे कधी उगवेल किरण दाखवाया दिशा

कितीवेळा केला प्रयत्न पेटवाया वात
न्यूनगंडाच्या दोरीने बांधले माझे हात

जमेल कि ना जमेल होई अशी द्विधा
काय म्हणतील लोक देतील कशी शिधा

आता हे पुरे झाले माझे नशिबाला कोसने
जे काही पदरी पडेल ते निमूटपणे सोसने

घेतला मी दीर्घ श्वास, घ्यावया उत्तुंग झेप
तोडूनिया बंधने सारी, मुक्त करेन ही जन्मठेप

उघडल्या मी साऱ्या खिडक्या
उघडले दरवाजे सारे
व्यापुदे स्वच्छंद वारे
माझ्या मनाचे गाभारे

नाही पसंत मला असले कुढत कुढत जगणे
घ्यायची आहे उंच भरारी जिंकायाला गगने

खूप केली व्यथा खूप कुरवाळीले दु:खासि
नवी उमेद उगवली चालवाया प्रकाशी

जिद्दीने मिळते सिद्धी झटकुनि आळस
वाढेल आत्मविश्वास चंद्रकलेने
गाठायचाय ... "यशकळस"
गाठायचाय ... "यशकळस"

कवितासंग्रह : मुक्तस्पंदन
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com


sachinikam

गाठायचाय ... "यशकळस"

sachinikam

उघडल्या मी साऱ्या खिडक्या
उघडले दरवाजे सारे
व्यापुदे स्वच्छंद वारे
माझ्या मनाचे गाभारे

sachinikam

जिद्दीने मिळते सिद्धी झटकुनि आळस
वाढेल आत्मविश्वास चंद्रकलेने
गाठायचाय ... "यशकळस"
गाठायचाय ... "यशकळस"

sachinikam

जिद्दीने मिळते सिद्धी झटकुनि आळस

वा छान कविता प्रेरणादायी

sachinikam

धन्यवाद विनायक.