शब्द

Started by sachinikam, March 31, 2015, 05:22:01 PM

Previous topic - Next topic

sachinikam

शब्द

शब्दांपासून ध्वनी प्रसवला, ध्वनीपासून ब्रह्मांड
अद्भूत किमया शब्दांची करती मुढास सज्ञान

कधी वाहती बनुनी प्रेमझरा
कधी ओघळती बनुनी अश्रुधारा
कधी रुळती ओठांवरती बनुनी हस्यापिसारा
कधी खेळती जनमनावरी बनुनी प्रेरित वारा

हे हे क्षेपणासत्रापरी प्रभावी, ह्यांत वज्र भेदण्याचे सामर्थ्य
कित्येक युगे उलटली भूमी पालटली, अजुनी अमर्त्य

अफाट शक्ती शब्दांमध्ये अन विलक्षण युक्ती
मिटवती कलह आपसातला, अन्यथा आपसांना मिटवती

शब्द अयोग्य चुकवि श्वास, निष्कारण जना करी निराश
शब्द अचिंत्य देई प्रकाश, व्यापुनी सारे धरणी आकाश

शब्दांच्या प्रज्ञेतून प्रसवले महामहामंत्र
शब्दांच्या प्रतिभेतून साकारले नवनवेतंत्र

वाणी शुद्ध प्रवाहे शुद्ध शब्दप्रयोगांमुळे
सुज्ञ तयासी समजावे तयाच्या शुद्ध विचारांमुळे .

कवितासंग्रह : मुकुलगंध
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

krishnakumar

आपल्या पुप्वजांनि कस्नेचे मनोरे उभारले असले तर त्यात आपण फसु नये.मला तरि वाटते शब्द वायुपासुन तयार झाला.वायु म्हणजे हवा अधिक एनर्जि याचे पुढेसंशोधन चालु आहे.  .मि शास्त्राचा विद्यार्थि नाहि पण काहितरि चुकते आहे असे सतत वाडत असते

sachinikam

कृष्णकुमार, कविता वाचल्याबद्दल धन्यवाद. शब्द कशापासून तयार झाला मलाही माहित नाही त्यामुळे त्याचा उल्लेख मी कवितेत केलाच नहिये. बाकी काही चूक असल्यास निदर्शनास आणून ध्यावी. बाकी माहितीसाठी तुम्ही मला थेट संपर्क करू शकता.

sachinikam

शब्दांची किमया सारी