वाटचाल (गझल)

Started by sachinikam, March 31, 2015, 05:38:01 PM

Previous topic - Next topic

sachinikam

वाटचाल (गझल)

आता अंधारात चालण्याची सवय झालीय मला
अन वाऱ्यासंगे बोलण्याची सवय झालीय मला
नव्हता शक्य कधीही एकटा अबोला
आता जगाविना जगण्याची कवय जमलीय मला .

ज्यांना समजले आपले आजवर त्यांनीच उडवले शिंतोडे
शहाण्यांच्या या दुनियेत शहाण्यांनीच ठरविले वेडे
ज्यांना पसंत नाही कधी त्यांनीच केला पंचनामा
रीतच निराळी ह्या जगाची विदुषकालाच रडविले थोडे

चौसष्ठ घरांच्या खेळात दीन प्यादा चालतोय
निमुटपणे पुढे सरकत नवीन कायदा पाळतोय
सरळ सरळ दिसतोय समोर मृत्युचा खंदक
डोळे मिटुनी लपण्यात दिन ज्यादा टाळतोय

का ओशाळला चेहरा तुझा पाहुनी माझी झोळी
काही नाही मागणार तुला जरी उदरात पेटली होळी
पाण्यासारखे माझे आचरण जिकडे उतार तिकडे वळी
तुझ्यात मिसळुनी ना झालो तुझा भेटली वाटचाल निराळी.

कवितासंग्रह : मुखदर्पण
कवी : सचिन निकम
पुणे
९८९००१६८२५
sachinikam@gmail.com

sachinikam

पाण्यासारखे माझे आचरण जिकडे उतार तिकडे वळी
तुझ्यात मिसळुनी ना झालो तुझा भेटली वाटचाल निराळी.